जिल्ह्यात 115 करोना बाधीत

433 रूग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात 115 करोना बाधीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील करोना रूग्णसंख्येत वाढ (Increase in the Number of Corona Patients in the District) होत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी 115 रूग्णांना करोना संसर्गाचे (Corona Positive Patient) निदान झाले. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रूग्णांची संख्या 433 इतकी झाली आहे. रूग्णवाढीमध्ये अहमदनगर शहर (Ahmednagar City), नगर ग्रामीण (Urban Rural) बरोबर संगमनेर तालुक्याने (Sangamner Taluka) आघाडी घेतली आहे. नगर शहर 21, नगर ग्रामीण 15 तर संगमनेर तालुक्यात 10 करोना बाधीत (Corona Positive) आढळून आले.

मध्यतंरी जिल्ह्यातील रूग्णसंख्या कमी झाली होती. त्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाढ होताना दिसून येत आहे. याला नागरिकांची बेफिकीरी कारणीभूत आहे. रूग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रशासनाने जमावबंदी लागू केली असली तरी त्याची अंमलबजावणी कुठेच होताना दिसत नाही. तर दुसरीकडे नागरिकांकडून करोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. यामुळे रूग्णसंख्या वाढू लागली आहे. बुधवारी बाधीत (Positive) आढळून आलेल्या रूग्णांमध्ये नगर शहर 21, नगर ग्रामीण 15, संगमनेर 10, श्रीगोंदा 9, पाथर्डी 8, पारनेर 8, अकोले 7, राहाता 6, शेवगाव 6, श्रीरामपूर 6, भिंगार 4, इतर जिल्हा 4, कर्जत 3, राहुरी 3, इतर राज्य 3, कोपरगाव 1, नेवासा 1 अशा रूग्णांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com