अहमदनगर|Ahmedagar

महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागा यांच्या निर्देशानुसार 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राज्यात हरविलेल्या बालकांच्या शोधमोहिमेसाठी ऑपरेशन मुस्कान- 9 ही शोध

मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 1 डिसेंबर पासून या मोहिमेला सुरवात झाली आहे. यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष कामाला लागला आहे.

हरविलेल्या बालकांच्या शोधासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याला याबाबत सुचना देण्यात आल्या आहे. प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर एक पोलीस पथक या कामासाठी नियुक्त केले आहे. रेल्वे स्थानके, बस स्थानके, रस्त्यावर भिक मागणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रूग्णालये, हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले अशा मुलांना हरविलेली मुले समजून नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्याला तत्काळ माहिती कळवावी असे अवाहन अधीक्षक पाटील यांनी केले आहे. जेणे करून एखाद्या कुटुंबातील हरविलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे कुटुंबाचे दु:ख दूर करण्यास मदत होईल. सदरची मोहिम जिल्ह्यात राबविण्यापूर्वी पोलीस अधीक्षक पाटील, अप्पर अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपअधीक्षक (गृह) प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस उपअधीक्षक, अशासकीय संस्था, बालगृह, बालकल्याण समिती, जिल्हा बालसुरक्षा कक्ष यांची शुक्रवारी (दि. 27) बैठक घेण्यात आली. तसेच पोलीस ठाण्यात नियुक्त केलेल्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची सोमवारी (दि. 30) बैठक बोलवून उपअधीक्षक (गृह) प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, वसंत पथवे यांनी सदर मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना केल्या. या मोहिमेसाठी अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, वसंत पथवे, पोलीस कर्मचारी एस. बी. कांबळे, ए. आर. काळे, आर. एस. म्हस्के, एस. के. घुटे, आर. एम. लोहाळे हे काम करीत आहे.