जिल्ह्यात पावणे आठ लाख लसघाबरे!

लस न घेणार्‍यांनी वाढविली प्रशासनाची डोकेदुखी
जिल्ह्यात पावणे आठ लाख लसघाबरे!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

देशासह राज्यात ओमिक्रॉनचे सावट वाढले आहे. नगर जिल्ह्यात देखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाला. असे असतांना अद्यापही लसीकरण हा विषय जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी गांभीर्याने घेतलेला नाही. अद्याप जिल्ह्यातील 7 लाख 83 हजार 2880 जणांनी पहिला डोस घेतलेला नाही. तर 20 लाख 2 हजार 19 नागरिक करोना प्रतिबंधात्मक लसचा दुसरा डोस घेतलेला नाही. लस असूनही ही स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, लस नाही तर प्रवेश नाही, या जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर नगरकर लसीकरणाला कसा प्रतिसाद देतात हे पाहवे लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकेसह अन्य काही देशात करोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन आढळल्यानंतर जगभर एकच खळबळ उडाली. आतातर भारतातही ओमिक्रॉन रुग्ण आढळलत आहेत. यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देत आहेत. जिल्ह्यात डिसेंबर महिन्यांत 3 तारखेला उच्चांकी 46 हजार 484 लसीकरण झाले होते. तर सर्वात कमी लसीकरण 1 हजार 129 हे 19 डिसेंबरला झालेले आहे. उर्वरित दिवशी जिल्ह्यात दैनदिन सरासरी 22 ते 28 हजार जणांचे लसीकरण होत आहे. जिल्ह्यात 36 लाख लोकांना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे.

त्यापैकी 28 लाख 20 हजार 320 जणांनी पहिला डोस, तर 16 लाख 1 हजार 581 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र अजूनही 7 लाख 83 हजार 280 लोकांनी एकही डोस घेतलेला नाही. तर 20 लाख 2 हजार नगरकरांचा दुसरा डोस बाकी आहे.

लसीकरण...कोणाचे किती?

जिल्ह्यात गटनिहाय अनुक्रमे पहिला व दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या ही फ्रंटलाईन वर्कर्स- 60 हजार 79 व 54 हजार 350, आरोग्य विभाग- 45 हजार 200 व 54 हजार 350, 18 ते 44 वयगट- 15 लाख 25 हजार 40 व 7 लाख 52 हजार 255, 45 ते 60 वयगट- 6 लाख 48 हजार 25 व 4 लाख 9 हजार 558, 60 वर्षांपुढील वयगट - 5 लाख 41 हजार 976 व 3 लाख 43 हजार 698 अशी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com