जिल्ह्यातील पालिका, नगरपंचायतींना 9 कोटी 29 लाखांचा निधी

जिल्ह्यातील पालिका, नगरपंचायतींना 9 कोटी 29 लाखांचा निधी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन 2021-22 वर्षातील अबंधनकारक/मुलभूत अनुदानाचा राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना पहिला हप्ता 184 कोटी 40 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनपासह सर्व पालिका आणि नगरपंचायतींच्या 9 कोटी 29 लाख 19 हजार 131 रुपयांच्या निधीचा समावेश आहे.

असे मिळणार अनुदान- अहमदनगर मनपा 3 कोटी 5 लाख 34 हजार 498 रुपये, श्रीरामपूर नगरपरिषद 76 लाख 33 हजार 623 रुपये, संगमनेर नगरपरिषद 58 लाख 56 हजार 116 रुपये, कोपरगाव नगरपरिषद 56 लाख 74 हजार 384 रुपये, राहुरी नगरपरिषद 42 लाख 33 हजार 250 रुपये, राहाता पिंपळस नगरपरिषद 23 लाख 86 हजार 717 रुपये, श्रीगोंदा नगरपरिषद 46 लाख 22 हजार 783 रुपये, देवळाली 36 लाख 14 हजार 643 रुपये, पाथर्डी 30 लाख, 60 हजार 229 रुपये, नेवासा नगरपरिषद 27 लाख 20 हजार 859 रुपये, शिर्डी नगरपंचायत 33 लाख 385 रुपये, जामखेड नगरपरिषद 48 लाख 45 हजार 953 रुपये, अकोले नगरपंचायत 19 लाख 69 हजार 746 रुपये, कर्जत 27 लाख 15 हजार 142 रुपये, पारनेर 24 लाख 1 हजार 834 रुपये, शेवगाव 46 लाख 27 हजार 258, अहमदनगर कटकमंडळ 27 लाख 21 हजार 711 रुपये.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com