जिल्ह्यातील 7 पालिकांमध्ये प्रशासकराज!

श्रीरामपूर, राहुरी, राहाता, संगमनेर, कोपरगाव, देवळाली, पाथर्डीसह शिर्डी नगरपंचायतचा समावेश
जिल्ह्यातील 7 पालिकांमध्ये प्रशासकराज!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा प्रस्ताव संमत केला आहे. यामुळे राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून मुदत संपलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदांवर राज्य शासनाने प्रशासकांची नियुक्ती केली आहे.

या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील 7 नगरपारिषद तसेच शिर्डी नगरपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले असल्याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, गुरूवारपासून हे प्रशासकराज सुरू होणार आहे. सध्या कोविड विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वत्रिक निवडणुका वेळेवर पार पाडणे शक्य होणार नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने मुदत संपलेल्या राज्यातील पालिकांचा कारभार प्रशासकांच्या हाती दिला आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यासह राज्यातील पालिकेची जबाबदारी प्रशासक म्हणून मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकार्‍यांकडे दिली गेलीय. राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती आणि नगरपरिषदांची मुदत या महिन्याच्या अखेरीस संपत आहे. यातील नगरपंचायतींची निवडणूक 21 डिसेंबर रोजी घेण्यात आली आहे. यातच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न देखील कायम असल्याने तेथेही अनारक्षीत जागांचीच निवडणूक झालेली आहे.

निवडणुका लांबणीवर

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर किमान सहा महिने निवडणुका होण्याची शक्यता मावळली आहे. कारण हा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका न घेण्याची विनंती सरकार निवडणूक आयोगाकडे करणार आहे. त्यामुळे अशा नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त करण्याबाबत नगर विकास विभागाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाल पालिका प्रशासन प्रशासकाच्या हाती जात असून निवडणूक होईपर्यंत हा कार्यभार त्यांच्याकडे राहणार आहे.

जिल्ह्यातील 7 नगरपरिषदांवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासक

श्रीरामपूर नगरपरिषद- प्रांताधिकारी

शिर्डी - प्रातांधिकारी

कोपरगाव - मुख्याधिकारी

संगमनेर -प्रांताधिकारी

पाथर्डी - मुख्याधिकारी

राहाता - मुख्याधिकारी

राहुरी - मुख्याधिकारी

देवळाली-प्रांताधिकारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com