
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मनसेच्या भोंगा प्रकरणावरून नगर शहरासह जिल्ह्यात खबरदारी घेतली जात आहे. नगर शहरात 200 पोलीसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यासह 15 मनसे पदाधिकार्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या असून शहरात चौका चौकात पोलिसांचे फिक्स पॉईंट लावण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली.
तसेच श्रीरामपूर, राहुरी तसेच अन्य ठिकाणी मनसे पदाधिकार्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ईद, अक्षय तितृया आणि मनसे भोंगा प्रकरणावरून एकत्रित 150 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आल्या होत्या. आता ईद आणि अक्षय तृतियाचा विषय संपला असून आज मनसेचा भोंगा प्रकरण आहे. यामुळे नगर शहरात पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत असून यासाठी अतिरिक्त 200 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून 15 मन सैनिकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यासह शहरात असणारे सीसी टीव्ही यंत्रणांचे मदत शांतता ठेवण्यात घेण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातही संशयित हालचालींवर पोलीसांची करडी नगर आहे.