
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नवीन वर्षातील जानेवारी 2023 या महिन्यासाठी राज्यातील विधानमंडळ सदस्यांना 138 कोटी, 3 लाख 35 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यात नगर जिल्ह्यातील 12 विधानसभा सदस्य आणि 2 विधान परिषद सदस्य अशा 14 आमदारांना एकूण 57 लाख 66 हजार 700 रुपयांच्या निधीचा समावेश आहे.
गत वर्षातील नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांसाठी प्रत्येक आमदाराला 80 लाख रुपयांचा निधी मिळाला होता.यावेळी नगर जिल्ह्यातील 12 विधानसभा सदस्य आणि 2 विधान परिषद सदस्य अशा 14 आमदारांना एकूण 1 कोटी 60 लाखांचा निधी प्राप्त झाला होता. गेल्या वर्षी 5 कोटींचा आमदार निधी मिळाल्याने विकास कामांना वेग आला होता. आता यावर्षीही प्रत्येक आमदारास 5 कोटींचा निधी मिळणार आहे. त्यापैकी पहिल्या जानेवारीचा निधीही आला आहे.