जिल्ह्यात हातभट्टीवर छापेमारी

 जिल्ह्यात हातभट्टीवर छापेमारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्ह्यातील हातभट्टी दारू अड्ड्यावर छापेमारी केली. दोन दिवसांमध्ये 10 ठिकाणी छापे टाकून दोन लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकूण 11 आरोपीविरोधात श्रीगोंदा, सोनई, तोफखाना, नगर तालुका, पारनेर, श्रीरामपूर शहर व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोर्जे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने ही कामगिरी केली. हातभट्टी दारू अड्ड्यावर होत असलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील हातभट्टी चालकांसह, दारू विक्रेत्यांचे दाबे दणाणले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com