सिव्हील हॉस्पिटलमध्ये 18 वर्षांखालील मुलांसाठी 100 खाटांचा स्वतंत्र विभाग

प्रत्येक ग्रामीण रुग्णालयातही करणार सुविधा
सिव्हील हॉस्पिटलमध्ये 18 वर्षांखालील मुलांसाठी 100 खाटांचा स्वतंत्र विभाग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यांत करोना बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये 18 वर्षांखालील मुलांचे प्रमाण 10 टक्क्यांच्या पुढे असल्याचे समोर आले आहे. यामुळे टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये 19 वर्षांखालील मुलांसाठी 100 बेडचा स्वतंत्र विभागासह 15 बेडचा आयसीयू सुरू करण्यात येणार आहे. यासह ग्रामीण रुग्णालयात अशी व्यस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

जिल्ह्यात साधारणपणे मे महिन्यांत 91 हजार करोना बाधित रुग्ण सापडलेले आहेत. यात 9 हजारांहून अधिक 18 वर्षाखालील मुलांचा समावेश आहे. त्यांची टक्केवारी 11. 5 टक्के असून एप्रिल महिन्यांत ही टक्केवारी 10 टक्के होती. याबाबतचा आणखी अभ्यास प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात 18 वर्षाखालील मुलांना करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. यामुळे टास्क फोर्सच्या सल्ल्यानूसार जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये 19 वर्षाखालील मुलांसाठी 100 बेडचा स्वतंत्र विभागासह 15 बेडचा आयसीयूसह प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी 18 वर्षाखालील मुलांवर करोना उपचार करण्यासाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

आडते बाजार, दाळमंडईची पाहणी

नगरच्या आडतेबाजार आणि दाळमंडई भागातील रस्त्यांच्या काल सायंकाळी उशीरा जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. प्रशानाने किरणा दुकानाना सकाळी 11 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, त्या किरणा दुकानात माल पाठविण्यासाठी आडते बाजार, दाळमंडई सुरू करण्याची मागणी व्यापार्‍यांची होती. याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी ही पाहणी केली असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com