नगर जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद

कोविड सेंटरमध्येच व्हावे लागणार भरती, सरकारचा निर्णय
नगर जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद

मुंबई -

अनेक करोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतानाही सुपर स्प्रेडर म्हणून फिरत आहेत. त्यामुळे अनेकांना करोनाची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने नगर, पुणे जिल्ह्यासह 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं आहे. त्या जिल्ह्यांची यादीही जारी केली आहे.

काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 18 जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. बैठकीनंतर टोपे यांनी मीडियाशी संवाद साधून बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोविड सेंटरची संख्या वाढवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. असं केल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असेलेल रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात. त्यालाही आळा बसेल, असं टोपे यांनी सांगितलं.

‘या’ जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद

बुलडाणा, अहमदनगर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा. सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद, रायगड, पुणे, नागपूर.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com