नगर जिल्ह्यात संततधार, आजही येलो अलर्ट

शेवगाव : नद्यांना पुन्हा पूर || मुळा, निळवंडे 80 टक्के भरण्याच्या मार्गावर || राहुरीत 3 इंच पाऊस
नगर जिल्ह्यात संततधार, आजही येलो अलर्ट
पारनेर तालुक्यातील वनकुटे ढवळपुरी परिसरात अतिवृष्टी झाल्याने काळूनदीला पूर आला या पाण्यामुळे पूल वाहून गेला.

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने याचा थेट आणि संपूर्ण परिणाम हा महाराष्ट्रावर होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील 2 ते 3 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेली संततधार मंगळवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. सर्वदूर पाऊस होत आहे. दरम्यान, आज बुधवारीही नगर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पारनेरातील ढवळपुरी परिसरात अतिवृष्टी झाल्याने नदीला पूर आला यात या नदीवरील पूल वाहून गेला. शेतपिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

बोधेगाव,चापडगाव मुंगी, भागासह काल मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अतिवृष्टी झाल्याने पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राहुरी शहर आणि मुळानगर परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसाची नोंद अनुक्रमे 70 आणि 76 मिमी झाली.

श्रीरामपूर शहर व परिसरात सोमवारी रात्री 8 वाजता सुरू झालेला पाऊस मंगळवारी रात्री 9 वाजेनंतरही सुरू होता. या पावसामुळे शेतीपिकांना जीवदान मिळाले असलेतरी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. शिर्डीत काल दुपारी जोरदार तर राहात्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत होता. कोपरगाव तालुक्यातही मध्यम पाऊस सुरू आहे.

संगमनेर शहर व तालुक्यात प्रथमच सर्वदूर पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. अकोले तालुक्यातही कमी अधिक पाऊस सुरू आहे. नेवासा तालुक्यातही पावसाने काहीसा जोर धरला होता.

राहुरी शहर व तालुक्यात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाल्याचे दृष्य होते. सोमवारी रात्री पारनेर तालुक्यात दमदार पाऊस झाला. तर मंगळवारी दिवसभर नगर शहर आणि परिसरात पाऊसाच्या जोरदारर सरी राहुन राहून कोसळत होत्या.

पारनेर तालुक्यातील वनकुटे ढवळपुरी परिसरात अतिवृष्टी झाल्याने काळूनदीला पूर आला या पाण्यामुळे पूल वाहून गेला.

बोधेगाव प्रतिनिधीने कळविले की, शेवगाव तालुक्यातील असंख्य भागात पावसाने काल मंगळवारी सकाळ पासून कमी अधिक प्रमाणात दिवशभर हजेरी लावली तर बोधेगाव,चापडगाव मुंगी, भागासह काल मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अतिवृष्टी झाल्याने पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरडगाव ता पाथर्डी व शिंगोरी नदीला पूर आल्याने पाथर्डी-बोधेगाव वाहतूक बंद झाली आहे. नांदनी नदीला पूर आल्याने आखेगाव, भगूर, वरूर, शेवगाव, जोहरापूर भागात जनता हवालदिल झाली आहे

बोधेगाव परिसरातील गोळेगाव, नागलवाडी, भागात जोरदारपणे अतिवृष्टीमुळे येथे काशी नदीला पूर आल्याने शेवगाव- गेवराई राज्यमार्ग बंद झाला आहे आज मंगळवारी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे

गेल्या आठवडाभरा पासून अतिवृष्टीमुळे खरिपातील कापूस, तूर, भुईमूग, बाजरी, पिकासह चारा पिके, भाजीपाला उभे ऊस पीक जमिनीवर लोळले गेले आहे नुकसानीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे पावसाचे थैमान अजूनही थांबत नसल्याने जनावरांचे मोठे हाल होत आहेत

दिवसभर कमी अधिक प्रमाणात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे आता पाऊस नको अशी म्हणण्याची वेळ आली आहे

परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याची माहिती महसूल प्रशासनकडून मिळाली असून शिंगोरी येथे पूरपरिस्थिती लक्षात घेता नदी काठच्या जनतेला सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा सूचना शेवगाव च्या तहसीलदार अर्चना पागिरे दिल्या आहेत

मुळा पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 700 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे 26000 दलघफू क्षमतेच्या धरणातील पाणीसाठा 20203 दलघफूटावर पोहचला होता. पाण्याची आवक सुरू झाल्याने या धरणातील पाणीसाठा लवकरच 80 टक्क्यांवर जाणार आहे.

मध्यंतर पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे धरणातील आवक मंदावली होती. त्यात आवर्तन सोडण्यात आल्याने धरणातील पाणीसाठा कमी होत होता. त्यामुळे शेतकर्‍यांना चिंता पडली होती. गत चार पाच दिवसांपासून पाणलोटात नूर बदलला. कोतूळला 45 मिमी पाऊस झाला. तसेच पारनेर तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. तसेच मुळानगर येथे 3 इंच पाऊस झाला. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक झाली. कोतूळ येथे मुळा नदीचा विसर्ग 886 क्युसेक आहे.

निळवंडेतील पाणीसाठा धिम्या गतीने वाढतो आहे. काल सकाळी 8130 दलघफू या धरणातील पाणीसाठा 6515 दलघफू (78.31 टक्के) झाला होता. भंडारदरा पाणलोटातही पावसाचा जोर वाढल्यास या धरणातील पाणीसाठाही येत्या काही दिवसांत 80 टक्क्यांवर जाणार आहे.

कुकडीतही आवक वाढली

पाऊस सुरू असल्याने कुकडी धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com