जिल्ह्यात आतापर्यंत ११४ टक्के पाऊस

गुरूवारी रात्री वांबोरीत १०७ मिलीमीटर पावसाची नोंद
जिल्ह्यात आतापर्यंत ११४ टक्के पाऊस
पाऊस

अहमदनगर (प्रतिनिधी)

गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने गुरूवारी जिल्ह्यात अनेक भागात जोरदार सलामी दिली.

राहुरी तालुक्यातील वांबोरी महसूल मंडलात एकच दिवसात १०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ११४. ४ टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत जिल्ह्याची चेरापुंजी असणाऱ्या अकोले तालुक्यापेक्षाही सध्या पाथर्डी तालुक्यातील पावसाची सरासरी अधिक आहे. अकोले तालुक्यात जून ते सप्टेंबर सरासरी ७५१.६ मिलीमीटर तर पाथर्डी तालुक्यात ७७७.५ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

गुरुवारी जिल्ह्यातील विविध महसूल मंडलात पावसाने दमदार हजेरी लावली असून यात सर्वाधिक पावसाची नोंद ही वांबोरीत १०७ मिलीमीटरची आहे. यासह नगर तालुक्यात भिंगार ३०.८, नागापूर २१.५, जेऊर २१.३, पारनेर ३८.५, सुपा ४४, मांडवगण (श्रीगोंदा) ३९.५, पाथर्डी ४८, माणिकदौंडी ३७.५, टाकळीमानूर ३६, करंजी ५५.३, वांबोरी १०७, ब्राम्हणी ५८. सोनई ४४.८, चांदा ३७.२ मिलीमीटर पावसाची झालेली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com