जिल्ह्यातील 33 गावांसह 55 ग्रामसेवकांचा होणार सन्मान

सुंदर गाव, आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे रविवारी ना. विखेंच्या हस्ते वितरण
जिल्ह्यातील 33 गावांसह 55 ग्रामसेवकांचा होणार सन्मान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनामुळे गत चार वर्षांपासूनचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, तसेच आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्काराचे वितरण रखडले होते. त्याला यंदा मुहूर्त मिळाला असून येत्या रविवारी (दि. 2 जुलै) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

सकाळी 11 वाजता सावेडीतील बंधन लॉन येथे होणार्‍या या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, महापौर रोहिणी शेंडगे यांच्यासह सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. ग्रामसेवकांच्या कामांचे मूल्यमापन होऊन गावची विकासाच्या दिशेने वाटचाल व्हावी, याकरिता शासनाने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार योजना आणली. परंतु करोनामुळे गत चार वर्षांपासून जिल्हा परिषदेने आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण केले नव्हते. केवळ घोषणा झालेली होती. आता एकत्रित 2018- 19 ते 2021- 22 या चार वर्षांतील एकूण 55 ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे पुरस्कार सोहळ्याचे नियोजन करत आहेत.

पुरस्कार्थी ग्रामसेवक पुढील प्रमाणे-

सन 2018- 19 : कुमार गणगे, हितेश ढुमणे, तानाजी पानसरे, संदीप शेटे, प्रतिभा पागिरे, संपत गोल्हार, अनिल भोईटे, माधवी बेंद्रे, किशोर टकले, सतीष मोटे, सचिन थोरात, सुनील दुधाडे, सुनील राजपुत. सन 2019- 20 : एकनाथ ढाकणे, संगीता देठे, दिलीप नागरगोजे, प्रदीप आसणे, वैशाली बोरूडे, रामदास कार्ले, रवींद्र बोर्से, कृष्णदास अहिरे, विशाल काळे, निलेश टेकाळे, आसाराम कपिले, उजाराणी शेलार, भाऊसाहेब पालवे, भैय्यासाहेब कोठुळे.

सन 2020- 21 : शिवाजी फुंदे, नसिम सय्यद, रमेश भालेराव, नंदा डामसे, गोपीचंद रोढे, प्रताप साबळे, गणेस पाखरे, संदीप लगड, गौतम जानेकर, स्वाती घोडके, मधुकर दहिफळे, शशिकांत नरोडे, अविनाश पगारे, सुधीर उंडे. सन 2021- 22 : सोपान बर्डे, राजेंद्र साखरे, रामदास गोरे, महेश शेळके, सुप्रिया शेटे, ललिता बोंद्रे, सुनील नागरे, वनिता कोहकडे, शशिकांत चौरे, सारिका मेहेत्रे, योगेश देशमुख, प्रियंका भोर, संजय दुशिंग, अर्जुन साबळे.

आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार 2021- 22

जिल्हास्तर : संवत्सर (ता. कोपरगाव) व थेरगाव (ता. कर्जत) यांना विभागून, तालुकास्तर - वीरगाव (अकोले), वेल्हाळे (संगमनेर), संवत्सर (कोपरगाव), बाभळेश्वर (राहाता), बेलापूर बु. व उंदिरगाव (श्रीरामपूर), तांदूळनेर (राहुरी), खुपटी (नेवासा), वडुले बु. (शेवगाव), येळी (पाथर्डी), मोहरी (जामखेड), थेरगाव (कर्जत), निमगाव खलू (श्रीगोंदा), मांडवे खु. (पारनेर), कोल्हेवाडी (नगर).

आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार 2022-23

जिल्हास्तर - आश्वी बु. (ता. संगमनेर) व वडगाव गुप्ता (ता. नगर) यांना विभागून. तालुकास्तर- विठा (अकोले), आश्वी बु. (संगमनेर), सडे (कोपरगाव), लोहगाव (राहाता), ब्राम्हणगाव वेताळ (श्रीरामपूर), दवणगाव (राहुरी), खामगाव (नेवासा), दहिगावने (शेवगाव), करंजी (पाथर्डी), फक्राबाद (जामखेड), खांडवी (कर्जत), मुंगूसगाव (श्रीगोंदा), हत्तलखिंडी (पारनेर), वडगाव गुप्ता (नगर).

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com