जिल्ह्यात दुपारी साडे तीनपर्यंत 71.46 टक्के मतदान

सर्वाधिक राहुरी तालुक्यात, तर सर्वात कमी जामखेडमध्ये
जिल्ह्यात दुपारी साडे तीनपर्यंत 71.46 टक्के मतदान

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 705 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली.

पहिल्या टप्प्यात सकाळी 9.30 पर्यंत मतदानाचा वेग कमी होता. या काळात अवघे 12 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर साडेअकारापर्यंत 31 टक्के झाले होते. मात्र, दुपारी दीड वाजपर्यत त्यात वाढ होवून जिल्ह्यात सरासरी 52 टक्के मतदान झाले होते.

दुपारी साडे तीन वाजता मतदानाची टक्केवारी 71.46 वर पोहचली. यामुळे यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विक्रमी मतदान होणार असल्याचे दिसत आहे.

सकाळी काहीसे धिम्मे असणारे मतदानासाठी दुपारी 12 नंतर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र अनेक ग्रामपंचायतींमध्ये दिसून आले. दुपारी साडेतीन वाजताच्या मिळालेल्या माहितीनूसार जिल्ह्यात 705 ग्रामपंचायतींसाठी 71.46 टक्के मतदान झाले होते.

यात 10 लाख 8 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. हाच वेग दुपारपर्यंत कमालीचा वाढला होता.यात सर्वाधिक मतदान राहुारी तालुक्यात 79.86 टक्के, तर सर्वात कमी मतदान जामखेडमध्ये 65.73 टक्के झालेले आहे.

तालुकानिहाय झालेले मतदान

अकोले 71.21, संगमनेर 72.82, कोपरगाव 70.22, श्रीरामपूर 71.61, राहाता 68.67, राहुरी 79.86, नेवासा 72.39, नगर 68.15, पारनेर 71.76, पाथर्डी 69.37, शेवगाव 74.18, कर्जत 74.50, जामखेड 65.63, श्रीगोंदा 68.73 एकूण 5165 असे मतदान झालेले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com