जिल्ह्यात राष्ट्रवादी नंबर वन !

83 सरपंच निवडून आल्याचा जिल्हाध्यक्ष फाळके यांचा दावा
जिल्ह्यात राष्ट्रवादी नंबर वन !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नुकतीच निवडणूक होऊन मतमोजणी झालेल्या 203 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी नंबर वन असल्याचा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फळके यांनी केला आहे. जिल्ह्यात 203 ग्रामपंचायतींपैकी 83 ठिकाणी राष्ट्रवादीचे सरंपच विराजमान झाल्याची माहिती फाळके यांनी दिली. तर दुसर्‍या स्थानावर भाजपचे 59 सरपंच असून काँग्रेसला 28 ठिकाणी तर शिवसेनेतील उध्दव ठाकरे गटाला 16 ठिकाणी सरपंच पद मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मंगळवारी दुपारी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हाती आला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या पतनानंतर ग्रामीण भागात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. पक्षाला 83 ठिकाणी सरंपच निवडून आणता आले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अवघ्या एका ठिकाणी सरपंचपद मिळाले आहे.

ग्रामपंचायत निकालानंतर राष्ट्रवादीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात राष्ट्रवादीला सर्वाधिकला सर्वाधिक सरपंच पद मिळाली असून त्यांची संख्या 83 आहे. त्याखालोखाल भाजप 59, काँग्रेस 28, उध्दव ठाकरे यांची शिवसेना 16, शिंदे शिवसेना 1 आणि अन्य 9, तर अपक्ष 7 असे सरपंच झालेले आहेत. अन्यमध्ये झालेल्या सरपंच यात स्थानिक आघाडी, शेवगावमधील जनशक्त मंच आणि पाथर्डीतील वंचित बहुजन आणि प्रहार यांचा समावेश आहे.

अकोले तालुक्यातील 11 सरपंच पदापैकी 10 राष्ट्रवादी आणि भाजप 1. संगमनेर तालुक्यात 37 सरपंच यापैकी काँग्रेस 27, भाजप 9 आणि 1 अपक्ष. कोपरगाव तालुक्यातील 26 सरपंच यापैकी 15 राष्ट्रवादी, ठाकरे सेना 1, भाजप 9 आणि अपक्ष 1. श्रीरामपूर तालुक्यातील 6 सरपंच यांच्यापैकी राष्ट्रवादी 2, मुरकुटे गट 2, मुरकुटे आणि ससाणे गट 1 आणि अपक्ष 1. राहाता तालुक्यातील 12 सरपंच यांच्यापैकी भाजप 11 आणि राष्ट्रवादी 1. नेवासा तालुक्यातील 13 सरपंचापैकी 12 ठाकरे शिवसेना (गडाख) आणि गडाख आणि घुले गट 1. शेवगाव तालुक्यातील 12 सरपंच यापैकी 8 राष्ट्रवादी, भाजप 3 आणि जनशक्ती 1. नगर तालुक्यातील 27 सरपंचपदापैकी 12 राष्ट्रवादी, 14 भाजप अन्य 1. पारनेर तालुक्यातील 16 सरपंच यापैकी 13 राष्ट्रवादी, 2 ठाकरे सेना, 1 शिंदे सेना. श्रीगोंदा तालुक्यातील 10 सरपंच पदापैकी 6 राष्ट्रवादी, 1 काँग्रेस, 3 अपक्ष. पाथर्डी तालुक्यातील 11 सरपंच पदापैकी राष्ट्रवादी 6, भाजप 2, वंचित आघाडी 1 आणि प्रहार संघटना 1 आणि अपक्ष 1. कर्जत तालुक्यातील 8 सरपंच पदापैकी 2 राष्ट्रवादी, 1 ठाकरे सेना, 5 भाजप. जामखेड तालुक्यातील 3 सरपंच यापैकी 2 राष्ट्रवादी आणि 1 भाजप असे मिळाल्याचा दावा राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आला आहे.

तर जिल्ह्यात महाविकास आघाडीवर

203 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीने दिलेल्या आकडेवारीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंचाची बेरीत केल्यास ती 127 होत आहे. तर भाजप आणि शिंदे गटाच्या सरपंच यांची संख्या 60 होत आहे. यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी ही भाजप- शिंदे गटाच्या दुप्पट असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीकडून दिलेल्या आकडेवारीत अनेक तालुक्यात विधानसभा निवडणुकीत दुसर्‍या तिसर्‍या फळीतील नेते राष्ट्रवादी सोबत असतात. तर स्थानिक निवडणूकांमध्ये अन्य राजकीय पक्षासोबत असतात. ग्रामपंचायत निवडणुकीत यापैकी निवडून आलेले सरपंच हे राष्ट्रवादी सोबत असल्याने त्यांना राष्ट्रवादीच्या आकडेवारीत गृहीत धरण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com