नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा

203 गावांत 18 डिसेंबरला मतदान || सरपंचांची निवड थेट जनतेतून || संबंधित गावांत आचारसंहिता लागू || संगमनेरातील 37 तर कोपरगावातील 27 गावांत राजकीय रणधुमाळी
ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आलीय. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. यात नगर जिल्ह्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या; तसेच नव्याने स्थापित 203 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने ऐन हिवाळ्यात गावागावांत राजकीय वातावरण तापणार आहे.

आगामी काळात येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा फायदा हा आगामी विधानसभा निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कंबर कसून तयारीला लागला आहे. अनेक वेगवेगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत. शिवसेनेला पडलेलं खिंडार, राष्ट्रवादी पक्षात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नाराजीच्या असलेल्या बातम्या, काँग्रेसची भारत जोडो यात्रा या सगळ्या घटना एकीकडे घडत असतानाच या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

नगर जिल्ह्यांतील 203 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आलीय. या निवडणुकीचा निकाल हा दोन दिवसांनी म्हणजे 20 डिसेंबरला समोर येईल.

संगमनेरातील 37, कोपरगावात 27 गावांत राजकीय रणधुमाळी

नगर जिल्ह्यात 203 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुराडा सुरू झाला असून संगमनेरातील तब्बल 37 गावांत त्या खालोखाल कोपरगावात 27 गावांमध्ये नवे शिलेदार निवडले जाणार आहेत. नगर तालुका 26, अकोले 11, जामखेड 3, कर्जत 8, नेवासा 13, पारनेर 16, पाथर्डी 11, राहाता 12, शेवगाव 12, श्रीरामपूर 6, राहुरी 11, श्रीगोंदा 10.

या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपद थेट जनतेतून असल्याने अनेकांनी महिन्यापासूनच फिल्डींग लावली असल्याचे दिसते मात्र, सरपंचपदाच्या आरक्षणाची अद्याप सोडत न झाल्याने काहींनी देव पाण्यात ठेवले आहे. तर काही इच्छुकांनी सरपंच पदाच्या सोडतीची वाट न पाहता मोर्चेबांधणी सुरू करत प्रभागातील उमेदवारांची चाचपणी केली आहे.

निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी दाखल - 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर

छाननी - 5 डिसेंबर

अर्ज माघारी अंतिम मुदत - 7 डिसेंबर

चिन्हांचे वाटप - 7 डिसेंबर

मतदान - 18 डिसेंबर 2022

मतमोजणी - 20 डिसेंबर 2022

या गावांत धुमशान

श्रीरामपूर - उंबरगाव, खंडाळा, वांगी खुर्द, वांगी बुद्रुक, कमालपूर, माळेवाडी

राहुरी - आरडगाव, मांजरी, मानोरी, कोंढवड, केंदळ खुर्द, ताहाराबाद, खडांबे खुर्द, ब्राम्हणगाव भांड, कोल्हार खुर्द, सोनगाव, तुळापूर

नेवासा - हंडीनिमगाव, सुरेशनगर, खुपटी, चिंचबन, गोधेगाव, भेंडा खुर्द, माका, अमळनेर, शिरेगाव, वडाळा बहिरोबा, माळीचिंचोरा, हिंगोणी, कांगोणी.

राहाता - नादुर्खी खुर्द, नादुर्खी बुद्रुक, राजुरी, डोर्‍हाळे, साकुरी, खडकेवाके, रांजणखोल, लोहगाव, आडगाव खुर्द, सावळीविहीर बु, नपावाडी, निघोज.

संगमनेर - साकूर, खराडी, वाघापूर, चिंचालीगुरव, जांभुळवाडी, रणखांबवाडी, दरेवाडी, जांबूत बुद्रुक, कर्जुलेपठार, डोळासणे, पिंपरणे, कोल्हेवाडी, कोळवाडे, मालुंजे, आंभोरे, निंबाळे, जोर्वे, वडझरी बुद्रुक, निमोण, वडझरी खुर्द, तळेगाव दिघे, हंगेवाडी, कनकापूर, करूले, निळवंडे, पोखरीहवेली, सादतपूर, रहिमपूर, उंबरीबाळापूर, निमगावजाळी, ओझर खुर्द, धांदरफळ बुद्रुक, निमगाव भोजापूर, चिकणी, सायखिंडी, घुलेवाडी.

कोपरगाव - डाऊच बु. डाऊच खुर्द, चांदेकसारे, देर्डे कोर्‍हाळे, रांजणगाव देशमुख, वेस- सोयेगाव, कोळपेवाडी, वडगाव, चासनळी, मोर्व्हिस, माहेगाव देशमुख, शहापूर, बहादराबाद, तळेगाव मळे, हांडेवाडी, बक्तरपूर, बहादरपूर, खोपडी, शिंगणापूर, करंजी बु, भोजडे, सडे, धारणगाव, पढेगाव, खिर्डी गणेश.

अकोले - अंभोळ, भंडारदरा, चास, डोंगरगाव, गुहिरे, लहित खुर्द, मुरशेत, शेंडी, शिळवंडी, सोमलवाडी, वाकी.

नगर - कापूरवाडी, सोनेवाडी, चास, पिंपळगाव कौडा, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद, दहिगाव, आगडगाव, पांगरमल, मदडगाव, टाकळी खातगाव, सोनेवाडी पिला, शेंडी, आठवड, साकत, नारायणडोह, कौडगाव जांब, वाळकी, उक्कडगाव, सारोळा बद्दी, राळेगण, रांजणी, नेप्ती, खातगाव टाकळी, पिंपळगाव लांडगा, वडगाव तांदळी, नांदगाव, जखणगाव.

पाथर्डी - भालगाव, वडगाव, कोळसांगवी, सोनोशी, कोरडगाव, जिरेवाडी, निवडुंगे, मोहरी, वैजुबाभुळगाव, तिसगाव, कोल्हार.

कर्जत - कोपर्डी, निंबे, अळसुंदे, मुळेवाडी, कौडाणे, बहिरोबावाडी, कापरेवाडी, म्हाळुंगी.

शेवगाव - अमरापूर, खानापूर, आखेगाव, जोहरापूर, रांजणी, भायगाव, खामगाव, दहिगावने, सुलतानपूर खु., कुरुडगाव (रावतळे), वाघोली, प्रभुवाडगाव.

पारनेर - भाळवणी, ढवळपुरी, पळशी, पाडळी तर्फे कान्हूर, कोहोकडी, गोरेगाव, चौंभूत, म्हस्केवाडी, सिद्धेश्वर वाडी, खत्तलखिंडी, करंदी, पिंपळगाव तुर्क, वनकुटे, भोंद्रे, पुणेवाडी, गुणोरे.

श्रीगोंदा - माठ, थिटेसांगवी, बनपिंप्री, तरडगव्हाण, घोगरगाव, चवरसांगवी, पारगाव सु., काष्टी, बेलवंडी बु., तांदळ दुमाला.

जामखेड - राजुरी, शिऊर, रत्नापूर.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com