
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्याचे राज्यपाल बैस हे 26 व 27 एप्रिल नगर जिल्हा दौर्यावर येत आहेत. या दोन दिवशीय दौर्यात राज्यपाल शिर्डी, नेवासा तालुक्यातील देवगड आणि राहुरीच्या महात्मा फुले विद्यापिठाला भेट देण्यात आहेत.
राज्यपाल बैस हे बुधवार (दि.26) सायंकाळी 4.45 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, नाशिक येथून हेलिकॉप्टरने शिर्डीकडे प्रयाण करत सायंकाळी 5.20 वाजता श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड, शिर्डी येथे आगमन होणार आहे. त्यानंतर शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे आगमन व राखीव असून दरम्यान श्री साईबाबा मंदिर शिर्डी येथे शेज आरतीस उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर गुरुवार (दि.27) रोजी सकाळी श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने देवगड (ता. नेवासा) श्री दत्त मंदिर संस्थान देवगड येथे पोहचणार आहे. त्यानंतर दुपारी 12.25 वाजता देवगड येथून हेलिकॉप्टरने महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे प्रयाण. दुपारी 1 आगमानानंतर दुपारी 3 ते 4.30 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथिल कार्यक्रमासाठी राखीव असून त्यांनतर पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होणार आहेत.