जिल्ह्यात 17 ठिकाणी जुगारावर छापे

26 जणांविरूध्द गुन्हा || एलसीबीची कारवाई
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 14 ते 23 नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, राहुरी, जामखेड, कोपरगाव, शेवगाव, नगर शहरातील पोलीस ठाणे हद्दीत 17 ठिकाणी सुरू असलेल्या जुगार, मटका धंद्यावर कारवाई केली. या प्रकरणी 26 जणांविरूध्द संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून त्यांच्याकडून एक लाख 87 हजार 410 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आयान साजिद सय्यद (वय 23 रा. कोल्हेवाडी ता. संगमनेर), हसनेन रऊफ पटेल (वय 23 रा. अलकानगर ता. संगमनेर), शाहिद सलिम मन्सुरी (वय 30), शेरू शफिक शेख (वय 27, दोघे रा. कोल्हार ता. राहाता), नावेद आश्रफ सय्यद (वय 20 रा. जहांगीरवाडा ता. संगमनेर), अत्तार शोएब सत्तार (वय 32 रा. कोल्हार), निहाजअली यासुद्दीन शेख (वय 27 रा. तीनबत्ती चौक, संगमनेर), शहारूक साजीद सय्यद (वय 27 रा. जहांगीरवाडा), अरबाबज रियाज देशमुख (वय 22 रा. जहांगीरवाडा), इजाज शेख अब्दुल करीम (वय 28 रा. मोगलपुर गल्ली, संगमनेर), करण अर्जुन साळुंके (मंगलगेट, नगर), योगेश चंद्रकांत ओहोळ (वय 38 रा. गणेशवाडी, शिर्डी, ता. राहाता), रावसाहेब विठ्ठल कावरे (वय 44 रा. पारनेर), अरूण सुखदेव काळे (वय 39 रा. जवळा ता. पारनेर), विलास शांताराम नन्नवरे (वय 43 रा. झेंडाचौक, श्रीगोंदा), दत्ता वसंत नन्नवरे (वय 45 रा. बाजारतळ, श्रीगोंदा), गोरख एकनाथ सुपारे (वय 32 रा. वडारगल्ली, शेवगाव), छबुराव रेवजी फुलपगार (वय 51 रा. उक्कलगाव ता. श्रीरामूपर), सागर मुरलीधर जाधव (वय 24 रा. ब्राम्हणी ता. राहुरी), मल्हारी धर्मराज मोरे (वय 40 रा. खंडोबा वस्ती ता. जामखेड), नितीन पोपट घायतडक (वय 34 रा. आरोळेवस्ती, जामखेड), नागनाथ शिवलिंग पानगांवकर (वय 54 रा. रविवारपेठ, खर्डा ता. जामखेड), अमोल सुभाष मांढरे (वय 36 रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा), दत्तात्रय महादेव गायकवाड (वय 40 रा. पिपळगाव पिसा), गौरव गोकुळ चौधरी (वय 32 रा. कायनेटीक चौक, नगर), रामदास काळुराम गायकवाड (वय 50 रा. कोकमठाण, कोपरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने या कारवाई केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com