नगर जिल्ह्यासाठी 16 कोटींचा निधी

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ लाभार्थ्यांना दिलासा
नगर जिल्ह्यासाठी 16 कोटींचा निधी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी सन 2023-2024 या आर्थिक वर्षात सुमारे 16 कोटींचे अनुदान वितरीत करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मंजुरी दिली आहे.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी एप्रिल 2023-2024 या कालावधीच्या खर्चासाठी राज्यासाठी 153 कोटी रूपयांच्या रकमेस मान्यता दिली आहे. त्यात नगर जिल्ह्याच्या 8 कोटी 64 लाख 520 हजार रुपयांच्या रकमेचा समावेश आहे.

अनुसूचित जमातीच्या राज्यभरातील लाभार्थ्यांसाठी 2023-24 या आर्थिक वर्षातील एप्रिल 2023 ते मार्च 2024 करीता 35 कोटी रूपयांचे अनुदान वितरणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील या योजनेखालील लाथार्थ्यांना 1 कोटी, 25 लाख 80 हजार 400 रूपयांचा समावेश आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षातील एप्रिल 2023 ते मार्च 2024 करीता 90 कोटींचा निधी देण्यात येत आहे त्यात नगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या वाट्याला 5 कोटी 15 लाख 21 हजार 300 रूपये येणार आहेत. तसेच अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी राज्यात 21 काटी 37 लाख 11 हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात नगर जिल्ह्यातील 93 लाख 96 हजार 900 रूपयांचा समावेश आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com