
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
आकाराने मोठ्या असणार्या नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशूधन आहे. या पशूधनासाठी मोठ्याप्रमाणात चार्यांची गरज असून सध्या पावसाळा लांबल्याने जिल्ह्यातील पशूसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाच्यावतीने चारा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात 13 लाख 78 हजार गायी आणि 2 लाख 21 हजार असे एकूण 15 लाख 99 हजार गायी वर्गीय जनावरांची संख्या असून त्यांना पुढील 20 जुलैपर्यंत म्हणजे पुरेल ऐवढा चारा उपलब्ध आहे.
नगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय वाढला असून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुध धंद्याकडे पाहिले जात आहे. यामुळे मोठ्या संख्याने पशूधनात वाढ झालेली आहे. दरम्यान, 20 जून आला असून अद्याप पावसाची प्रतिक्षा असल्याने शेतकर्यांना पेरण्यासोबत आता जनावरांच्या चार्यांची चिंता आहे. पाऊस लांबल्याने
पाऊस लांबल्याने आता कृषी विभागासोबत आता पशूसंवर्धन विभाग चिंतेत आहे. विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पाथर्डी, कर्जत, जामखेडसह अन्य काही तालुक्यात महिनाभरानंतर चार्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पशूसंवर्ध विभागाने वैरण विकाससह मूग घास यासह चारा निमिर्ती करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात मार्च 2023 अखेर आवश्यक असणार्या पशूधनासाठी 76 लाख 11 हजार 990 मेट्रीक टन चारा उपलब्ध होता. यापैकी आतापर्यंत 45 लाख 72 हजार 898 मेट्रीक टनचारा वापरण्यात आला असून यापैकी शिल्लक चारा हा 20 जुलैपर्यंत शिल्लक राहणार असल्याचा पशूसंवर्धन विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, हवामान विभागाचा जुलै महिन्यांत पावसाचा अंदाज असून पाऊस सुरु झाल्यावर बर्याच प्रमाणात जनावरांच्या चार्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
चारा टंचाईचा दूधावर परिणाम
पाऊस लांबल्याने नगर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासोबत खरीप पेरण्याचा प्रश्न आहे. यात जनावरांच्या चार्यांचा विषय असून चारा टंचाई झाल्यास त्याचा थेट परिणाम दूध व्यवसायवर होणार आहे. सध्या उत्तर नगर जिल्ह्यास दक्षिणेतील काही तालुक्यात पाण्याची स्थिती बरी आहे. मात्र, पाऊस आणखी लांबल्यास माणसांसोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यात चार्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.