जिल्ह्यात होणार 9 लाख ध्वजांचे वाटप

झेडपीचे 75 हजारांचे टार्गेट : कर्मचार्‍यांकडून ‘स्व’ खूशीने जमा करणार निधी
जिल्ह्यात होणार 9 लाख ध्वजांचे वाटप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे येत्या 15 ऑगस्टला प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकणार आहे. यासाठी जिल्ह्यात नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यासाठी 9 लाख ध्वज वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात जिल्हा परिषदेच्या वाट्याला 75 हजार ध्वज उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे ध्वज विकत घेण्यासाठी तालुकानिहाय झेडपी, पंचायत समिती कर्मचार्‍यांकडून ‘स्व’ खूशीने निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून सांगण्यात आले.

प्रत्येक घरावर ध्वज या उपक्रमासाठी समिती स्थापन करण्यात आली असून जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सहअध्यक्ष आहेत. तर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे नोडल अधिकारी आहेत. 9 लाख ध्वज वाटपात जिल्हा परिषदेच्या वाट्याला 75 हजार ध्वजांचे उद्दिष्ट असून उर्वरित 8 लाख 25 हजार ध्वज हे महापालिका आणि नगर परिषद, नगर पालिका हद्दीतील आहे.

जिल्हा परिषदे मार्फत वाटप करण्यात येणार्‍या ध्वजासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कर्मचार्‍यांकडून ‘स्व’ खूशीने उपलब्ध करणार आहे. एका ध्वजाची किंमत 30 रुपये असून त्याचा आकार हा 20 बाय 30 इंच ठरवण्यात आलेला आहे. 75 हजार झेंडे विकत घेण्यासाठी 14 तालुक्यातील आणि नगरच्या मुख्यालयातील कर्मचार्‍यांकडू 2 लाख 25 हजारांचा निधी जमा करण्यात येणार आहे. हा निधी जमा करून झेंड प्रत्यक्षात तालुका पातळीवर पोहच करण्यासाठी 30 जुलैची डेडलाईन देण्यात आलेली आहे.

या उपक्रमात झेडपी कर्मचार्‍यांना निधी जमा करण्याची सक्ती नाही. एकतर कर्मचारी पैसे देतील अथवा पैसे संकलित करून ते स्वत: ध्वज विकत घेवून पंचायत समिती पातळीवर गटविकास अधिकारी यांच्याकडे जमा करणार आहेत. याबाबतच्या सुचना गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या असल्याचे ग्रामपंचायत विभागाकडून सांगण्यात आले.

प्रत्येक घरा झेंडा या उपक्रमात प्रत्येक कुटूंब ही बेसलाईन ठेवण्यात आलेली आहे. मात्र, ज्या ठिकाणी सार्वजनिक इमारत आहे, त्याठिकाणी संपूर्ण इमारत म्हणून एकच ध्वज फडकावला जावू शकतो. प्रत्येक काही तालुक्यात जादा तर काही ठिकाणी कमी ध्वज दिले जातील, असे ही ग्रामपंचायत विभागाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com