
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यातील 11 उपजिल्हाधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या जागेवर 10 उपजिल्हाधिकार्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारीपदी हेमा बडे यांची नियुक्ती झाली आहे. बडे या नागपूरहून नगरला येत आहेत.
राज्य शासनाने उपजिल्हाधिकार्यांचा कार्यकाळ पूर्ण होणे, प्रशासकीय कारणास्तव आणि विनंती अशा कारणातून बदल्या केल्या आहेत.
कर्जतचे निलंबित प्रांताधिकारी अजित थोरबोले यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नितीन पाटील यांची नियुक्ती झाली आहे. कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी आणि नवनियुक्त अधिकारी याप्रमाणे : उर्मिला पाटील (महसूल) अरविंद नरसीकर, जयश्री माळी (जिल्हा पुरवठा अधिकारी) हेमा बडे, जितेंद्र पाटील (निवडणूक) राहुल पाटील, उज्जवला गाडेकर (भूसंपादन अधिकारी क्रमांक -7), संदीप चव्हाण (भूसंपादन अधिकारी क्रमांक -15) गौरी सावंत, गोविंद शिंदे (प्रांताधिकारी, शिर्डी) माणिक आहेर, अनिल पवार (प्रांताधिकारी, श्रीरामपूर) किरण सावंत- पाटील, श्रीनिवास अर्जुन (प्रांताधिकारी, नगर) सुधीर चक्कर- पाटील, सुधाकर भोसले (प्रांताधिकारी, श्रीगोंदे- पारनेर)- गणेश राठोड, अजित थोरबोले (प्रांताधिकारी, कर्जत) नितीन पाटील, पल्लवी निर्मळ (पुनर्वसन) शाहूराज मोरे यांची नियुक्ती झाली आहे.
श्रीरामपूरला नियुक्त करण्यात आलेले प्रातांधिकारी सावंत पाटील जळगाव येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) म्हणून कार्यरत होते. सावंत पाटील आज पदभार स्विकारणार आहेत. अनिल पवार अद्याप नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांची सावंत पाटील यांच्या जागेवर नियुक्ती झाली आहे.