बापरे... नगरचा करोना पॉझिटीव्हीटीचा रेट 22.17 टक्के

रविवारी वाढले दीड हजार || उपचार घेणारे दहा हजारांच्या पुढे
बापरे... नगरचा करोना पॉझिटीव्हीटीचा रेट 22.17 टक्के

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात (District) रविवारी 510 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Corona Patient Discharge) देण्यात आला. यामुळे करोनामुक्तांची संख्या आता 3 लाख 55 हजार 947 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 95.34 टक्के इतके आहे. विशेष म्हणजे रविवारी करोना पॉझिटीव्हीटीचा (Corona Positivity Rate) रेट हा 22.17 होता. 7 हजार 94 संशयीतांपैकी 1 हजार 573 नवे बाधित समोर आले यामुळे उपचार घेणार्‍यांची संख्या आता 10 हजार 246 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 566 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 616 आणि अँटीजेन चाचणीत (Antigen Test) 391 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत (Positive) आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 152, अकाले 71, जामखेड 19, कर्जत 31, नगर ग्रामीण 31, नेवासा 22, पारनेर 29, पाथर्डी 32, राहता 4, राहुरी 17, संगमनेर 4, शेवगांव 26, श्रीगोंदा 48, श्रीरामपूर 2, कॅन्टोनमेंट बोर्ड 56, मिलिटरी हॉस्पिटल 19 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 246, अकोले 23, जामखेड 4, कर्जत 6, कोपरगाव 21, नगर ग्रामीण 46, नेवासा 19, पारनेर 31, पाथर्डी 11, राहाता 99, राहुरी 15, संगमनेर 6, शेवगाव 4, श्रीगोंदा 16, श्रीरामपूर 16, कॅन्टोन्मेंट बोर्ड 11 आणि इतर जिल्हा 40 आणि इतर राज्य 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 391 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 111, अकोले 23, जामखेड 10, कर्जत 3, कोपरगाव 21, नगर ग्रामीण 22, नेवासा 9, पारनेर 5, पाथर्डी 49, राहाता 69, राहुरी 15, संगमनेर 6, शेवगाव 4, श्रीगोंदा 16, श्रीरामपूर 16, कॅन्टोन्मेंट बोर्ड 5, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com