करोना मृतांच्या आकड्याने ओलांडला सात हजारांचा टप्पा

करोना मृतांच्या आकड्याने ओलांडला सात हजारांचा टप्पा
करोना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात शनिवारी 253 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे झालेल्यांची संख्या 3 लाख 44 हजार 889 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.60 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 240 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1 हजार 470 इतकी झाली आहे. तर करोनामुळे मृत्यू झालेल्याच्या संख्यने काल सात हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 79, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 124 आणि अँटीजेन चाचणीत 37 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 2, अकोले 6, कोपरगाव 3, नगर ग्रामीण 6, पारनेर 13, राहता 2, राहुरी 8, संगमनेर 20, शेवगाव 2, श्रीगोंदा 14, कँटोन्मेंट बोर्ड 1, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 13, अकोले 1, जामखेड 2, कर्जत 3, कोपरगाव 3, नगर ग्रामीण 7, नेवासा 9, पारनेर 2, पाथर्डी 1, राहता 33, राहुरी 7, संगमनेर 5, शेवगाव 7, श्रीगोंदा 16, श्रीरामपूर 7, कँटोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 7 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत काल 37 जण बाधित आढळुन आले. अकोले 2, कर्जत 11, कोपरगाव 8, नेवासा 1, पारनेर 3, पाथर्डी 1, राहता 2, राहुरी 1, संगमनेर 1, शेवगाव 1, श्रीगोंदा 3, श्रीरामपूर 1 आणि इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील करोना मृतांच्या आकड्यात शनिवारी वाढ होवून करोना पोर्टलवरील मृत्यू नोंद ही 7 हजार 3 झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com