करोनामुक्तीचा टक्का वाढला

873 रुग्णांना डिस्चार्ज : 619 बाधितांची भर
करोनामुक्तीचा टक्का वाढला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahemdnagar

जिल्ह्यात करोनातून बरे होणार्‍यांचा टक्का वाढला आहे. काल 873 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 21 हजार 632 झाली असून हे प्रमाण 96.40 टक्के आहे. दरम्यान, काल 619 बाधित वाढले. सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 354 आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 125, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 295 आणि अँटीजेन चाचणीत 199 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 11, जामखेड 4, कर्जत 2, नगर ग्रामीण 3, नेवासा 1, पारनेर 12, पाथर्डी 32, राहुरी 2, संगमनेर 7, शेवगाव 1, श्रीगोंदा 48 व अन्य जिल्ह्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 16, अकोले 24, जामखेड 06, कर्जत 09, कोपरगाव 4, नगर ग्रामीण 23, नेवासा 22, पारनेर 14, पाथर्डी 12, राहाता 7, राहुरी 7, संगमनेर 68, शेवगाव 28, श्रीगोंदा 16, श्रीरामपूर 29, कॅन्टोन्मेंट बोर्ड 4 व अन्य जिल्ह्यांतील 6 रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 199 जण बाधित आढळले. अकोले 17, जामखेड 3, कर्जत 17, कोपरगाव 11, नगर ग्रामीण 3, नेवासा 32, पारनेर 16, पाथर्डी 20, राहाता 1, राहुरी 4, संगमनेर 46, शेवगाव 21, श्रीगोंदा 6 आणि श्रीरामपूर तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.

उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अकोले 55, जामखेड 22, कर्जत 64, कोपरगाव 41, नगर ग्रामीत 35, नेवासा 50, पारनेर 139, पाथर्डी 34, राहाता 17, राहुरी 33, संगमनेर 194, शेवगाव 38, श्रीगोंदा 83, श्रीरामपूर 28 अशी आहे. नगर मनपाक्षेत्रात 23 तर मिलिटरी हॉस्पिटलमधून 3 जण बरे होवून घरी परतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com