जिल्ह्यात करोनाचे एवढे रूग्ण वाढले

जिल्ह्यात करोनाचे एवढे रूग्ण वाढले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रविवारी जिल्ह्यात 145 रूग्णांना करोना संसर्गाचे (Covid 19) निदान झाले. सध्या एक हजार 79 रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 140 रूग्णांना उपचारानंतर रूग्णालयातून (Hospital) घरी सोडण्यात आले. दरम्यान आतापर्यत तीन लाख 46 हजार 474 रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. रूग्ण (Patient) बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 97.71 टक्के आहे.

बाधितांमध्ये (Positive) जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 60, खाजगी प्रयोगशाळेत 63 आणि अँटीजेन चाचणीत 22 रूग्ण आढळले. बाधीत आढळून आल्यामध्ये राहता 30, मनपा 5, जामखेड 2, कर्जत 19, कोपरगाव 7, अकोले 2, नगर ग्रामीण 7, नेवासा 12, पारनेर 14, पाथर्डी 4, राहुरी 11, संगमनेर 12, शेवगाव 6, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 2, मिलिटरी हॉस्पिटल 4 आणि इतर जिल्हा 6 अशा रूग्णांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com