Corona Update : जिल्ह्यात आज ‘इतक्या’ नवीन बाधितांची वाढ

Corona Update : जिल्ह्यात आज ‘इतक्या’ नवीन बाधितांची वाढ
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात रविवार (दि.2) 3 हजार 822 नवे करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे उपचार घेणार्‍यांची संख्या आता 23 हजार 712 झाली आहे. यासह रविवारी 41 असे 78 करोना रुग्ण वाढल्याने आता जिल्ह्यातील करोना बळींचा आकडा हा 2 हजार 71 झाला आहे. कालच्या बाधितांच्या आकड्यांमध्ये संगमनेर तालुका जिल्ह्यात टॉपवर असल्याचे दिसत आहे.

रविवारी 3 हजार 739 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत करोना मुक्त झालेल्यांची संख्या आता 1 लाख 57 हजार 298 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता 85.92 टक्के इतके झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये रविवारी 1 हजार 288, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 587 आणि अँटीजेन चाचणीत 947 रुग्ण बाधीत आढळले.

- असे आहेत रूग्ण

नगर मनपा- 547

संगमनेर - 566

राहाता- 259

श्रीरामपुर - 104

नेवासा - 171

नगर तालुका - 317

पाथर्डी - 127

अकोले - 192

कोपरगाव- 210

कर्जत - 267

पारनेर - 201

राहुरी- 187

भिंगार - 61

शेवगाव -155

जामखेड - 18

श्रीगोंदा - 347

इतर जिल्हा- 75

इतर राज्ये- 04

लष्कर हॉस्पिटल - 14

45 मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा

रविवारी दिवसभर नगर शहरात 45 मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे काल दिवसभर शहरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होता. दरम्यान, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन बेडसाठी रविवारी नगर शहारात आणबाणीची परिस्थिती कायम होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com