करोना
करोना
सार्वमत

21 मृत्यूंसह नव्याने 459 करोना रुग्ण वाढले

मृतांची आकडेवारी 153; पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 12 हजार 260; करोना मुक्तांची वाटचाल 9 हजारांच्या दिशेने

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यातील करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात नव्याने करोनाचे 459 रुग्ण समोर आले आहेत. यामुळे करोना बाधितांच्या आकड्याने 12 हजारांचा टप्पा ओलांडला असून एकूण बाधितांची संख्या आता 12 हजार 260 झाली आहे.

याासह करोनावर मात केलेल्यांची संख्या 8 हजार 993 झाली असली तरी शुक्रवारी एकाच दिवसांत करोना मृतांच्या आकडेवारी एकदम 21 ची वाढ झाल्याने करोना मृतांची संख्या 153 झाली आहे. तर जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 3 हजार 114 आहे.

शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 82, अँटीजेन चाचणीत 177 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 200 रुग्ण बाधित आढळले. यातील जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 46, नगर ग्रामीण 10, भिंगार कॅन्टोन्मेंट 6, पारनेर 14, शेवगाव 1, कोपरगाव 1, कर्जत 1, मिलीटरी हॉस्पिटल 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल 177 जण बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर 14, राहाता 8, पाथर्डी 14, श्रीरामपूर 7, कँटोन्मेंट 7, नेवासा 26, श्रीगोंदा 19, पारनेर 1, अकोले 9 राहुरी 7, शेवगाव 25, कोपरगाव 8, जामखेड 9 आणि कर्जत 23 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 200 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

यामध्ये, मनपा 135 संगमनेर 7, राहाता 2, पाथर्डी 3, नगर ग्रामीण 22, श्रीरामपूर 4, कॅन्टोन्मेंट 5, नेवासा 7, पारनेर 4, अकोले 1, राहुरी 2 शेवगाव 1, जामखेड 4, कर्जत 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अण्णा हजारे यांची चाचणी निगेटिव्ह

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथे वास्तव्य असलेल्या शेजारील वर्तक मळा येथे करोनाचे सहा रुग्ण आढळल्याने अण्णांनी देखील रॅपिड अँटिजेन व घशाच्या स्त्रावाची टेस्ट करून घेतली होती, या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी प्रकाश लाळगे यांनी दिली. अण्णांचे वास्तव्य असलेल्या परिसरालगतच 14 दिवसांसाठी हे क्षेत्र प्रतिबंधक घोषित करण्यात आले आहे.

532 घरी सोडले

शुक्रवारी सकाळी 532 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा 203, संगमनेर 43, राहाता 10, पाथर्डी 32, नगर ग्रामीण 21, श्रीरामपूर 19, कॅन्टोन्मेंट 24, नेवासा 21, श्रीगोंदा 24, पारनेर 20, अकोले 7, राहुरी 8, शेवगाव 25, कोपरगाव 34, जामखेड 10, कर्जत 29, मिलिटरी हॉस्पिटल 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

सारांश

* बरे झालेली रुग्ण संख्या 8 हजार 993

* उपचार सुरू असलेले रूग्ण 3 हजार 114

* मृत्यू 153

* एकूण रूग्ण संख्या 12 हजार 260

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com