संगमनेरपाठोपाठ आता श्रीगोंद्यात करोनाची बाधा

संगमनेरपाठोपाठ आता श्रीगोंद्यात करोनाची बाधा
करोना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात रविवारी 703 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Patient Discharge) देण्यात आला. यामुळे करोनातून मुक्त (Covid Free) झालेल्यांची संख्या आता 3 लाख 20 हजार 759 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.32 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 719 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 5 हजार 601 इतकी झाली आहे. संगमनेरमध्ये (Sangamner) नव्याने 184 तर श्रीगोंद्यात (Shrigonda) 78 करोना बाधित (Covid Positive) आढळून आलेले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 207, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 291 आणि अँटीजेन चाचणीत (Antigen Testing) 221 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 17, अकोले 1, जामखेड 15, कर्जत 1, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 17, नेवासा 1, पारनेर 4, पाथर्डी 6, राहुरी 1, संगमनेर 95, शेवगाव 3, श्रीगोंदा 39, श्रीरामपूर 1, कँटोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 15, अकोले 24, जामखेड 2, कर्जत 14, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 8, नेवासा 13, पारनेर 20, पाथर्डी 4, राहाता 38, राहुरी 12, संगमनेर 65, शेवगाव 13, श्रीगोंदा 21, श्रीरामपूर 14 आणि इतर जिल्हा 5 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत (Antigen Testing) काल 221 जण बाधित आढळुन आले. मनपा 1, अकोले 39, जामखेड 1, कर्जत 19, कोपरगाव 17, नगर ग्रामीण 5, नेवासा 8, पारनेर 32, पाथर्डी 10, राहाता 16, राहुरी 13, संगमनेर 24, शेवगाव 15, श्रीगोंदा 18, श्रीरामपुर 1 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, काल डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 36, अकोले 84, जामखेड 14, कर्जत 16, कोपरगाव 4, नगर ग्रामीण 34, नेवासा 29, पारनेर 86, पाथर्डी 77, राहाता 43, राहुरी 23, संगमनेर 158, शेवगाव 27, श्रीगोंदा 47, श्रीरामपूर 18, कँटोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com