Corona : जिल्ह्यात तिसर्‍या दिवशी दिलासा अन् धक्काही

नव्या बाधितांची संख्या घटली, मात्र मृतांचा आकडा वाढला
Corona : जिल्ह्यात तिसर्‍या दिवशी दिलासा अन् धक्काही

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यासाठी सलग तिसर्‍या दिवशी दिलासादायक ठरला आहे. मात्र, एका दिवसात जिल्ह्यातील मृतांच्या आकडेवारीत 70 ने वाढ झाल्याने करोना मृत्यू वाढल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, काल 2 हजार 725 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर नव्याने 2 हजार 655 करोना रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात करोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 40 हजार 411 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 85.08 टक्के झाले आहे. तर उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 22 हजार 700 आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 701, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 185 आणि अँटीजेन चाचणीत 769 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 64, अकोले 95, जामखेड 42, कर्जत 88, कोपरगाव 64, नगर ग्रामीण 31, नेवासा 31, पारनेर 12, पाथर्डी 64, राहाता 54, राहुरी 31, संगमनेर 14, शेवगाव 45, श्रीगोंदा 36, श्रीरामपूर 26, कँटोन्मेंट बोर्ड 3 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 482, अकोले 11, जामखेड 12, कर्जत 18, कोपरगाव 38, नगर ग्रामीण 135, नेवासा 29, पारनेर 39, पाथर्डी 22, राहाता 135, राहुरी 36, संगमनेर 77, शेवगाव 12, श्रीगोंदा 25, श्रीरामपूर 83, कँटोन्मेंट बोर्ड 14 आणि इतर जिल्हा 17 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 769 जण बाधित आढळून आले. मनपा 35, अकोले 27, जामखेड 32, कोपरगाव 14, नगर ग्रामीण 55, नेवासा 53, पारनेर 66, पाथर्डी 11, राहाता 112, राहुरी 151, संगमनेर 57, शेवगाव 14 श्रीगोंदा 100, श्रीरामपूर 35, कँटोन्मेंट 1 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सोमवारी 1 हजार 849 करोना रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता. यात मंगळवारी 70 ने वाढ झाल्याने करोना बळींचा आकडा आता 1 हजार 919 झाला आहे.

असे आहेत रुग्ण

नगर मनपा 581, राहाता 301, नगर ग्रामीण 221, राहुरी 218, श्रीगोंदा 161, संगमनेर 148, श्रीरामपूर 144, अकोले 133, पारनेर 117, कोपरगाव 116, नेवासा 113, कर्जत 106, पाथर्डी 97, जामखेड 86, शेवगाव 71, अन्य जिल्हा 24, भिंगार 18 आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com