जिल्ह्यात करोना मृतांची संख्या पाच हजारांच्या पुढे

679 नवे रुग्ण वाढले
जिल्ह्यात करोना मृतांची संख्या पाच हजारांच्या पुढे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पोर्टलवर आकडेवारी अपडेट होत असल्याने आतापर्यंत पाच हजार 338 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात गुरूवारी 392 मृतांची नोंद झाली. दरम्यान करोना रुग्णसंख्येत 679 रुग्णांची भर पडली असून यामुळे उपचार सुरू असणार्‍यांची संख्या आता तीन हजार 447 इतकी झाली आहे. तसेच 681 रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.80 टक्के इतके झाले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 8, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 145 आणि अँटीजेन चाचणीत 526 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयानुसार मनपा 2 आणि श्रीगोंदा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत मनपा 2, अकोले 3, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 4, नेवासा 10, पारनेर 20, पाथर्डी 1, राहाता 17, राहुरी 23, संगमनेर 25, शेवगाव 19, श्रीरामपूर 14 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 526 जण बाधित आढळुन आले. मनपा 145, अकोले 13, जामखेड 9, कर्जत 19, कोपरगाव 6, नगर ग्रामीण 60, नेवासा 11, पारनेर 82, पाथर्डी 48, राहाता 16, राहुरी 24, संगमनेर 10, शेवगाव 28, श्रीगोंदा 26, श्रीरामपूर 5, कँटोन्मेंट बोर्ड 4 आणि इतर जिल्हा 20 अशा रुग्णांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com