नगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला

नगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या तीन दिवसांपासून थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. काही भागात धुक्याची चादर पसरल्याचेही चित्र पहावयास मिळत आहे. त्यात काल बुधवारी सूर्याचे दर्शन न झाल्याने श्रीरामपूर, संगमनेर, राहुरीसह अन्य भागात दिवसभर नागरिक थंडीने गारठले होते.

दिवसभरही नागरिकांनी उबदार कपडे परिधान केले होते. या वाढत्या थंडीने सर्दी, खोकला, तापाचे रूग्ण वाढू लागले आहेत.थंडी गहू, हरभरा व अन्य पिकांना पोषक असलीतरी ढगाळ हवामानामुळे शेतकर्‍यांची चिंताही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वाढत्या कडाक्याने ग्रामीण भागात ग्रामस्थांनी शेकोटीचा आधार घेतल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच रस्त्यावरची वर्दळही थंडावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com