अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गुलाबी थंडीचा अनुभव घेतल्यानंतर जिल्ह्याच्या तापमानात घट होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे.

जिल्ह्यात गत आठवड्यापासून थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाची घट पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडीचा कडाका वाढला आहे.

अहमदनगरसह पुणे, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर आणि इतर अनेक जिल्ह्यात किमान सरासरी तापमानात कमालीची घट झाल्याचे दिसते आहे. तापमानाचा पारा 10 अंशावर घसरल्याने पहाटे हवेत गारवा जाणवू लागला आहे.

थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वेटर, मफलर, कानटोप्या त्याशिवाय शेकोट्यांचा आधार घेत आहेत. सकाळी मॉर्निग वॉक करणारे उबदार कपड्यांचा वापर करू लागले आहे. भल्या पहाटेच गार वार्याची झुळक आणि दिवसभरही थंडी जाणवू लागली आहे.