नगर अग्नितांडव : दोषींवर कारवाई होणार - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार

नगर अग्नितांडव : दोषींवर कारवाई होणार - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार

अहमदनगर | Ahmedagar

जिल्हा रुग्णालयातील घडलेली घटना दुर्दैवी असून येथे राजकारण करणे योग्य नाही आणि जर कुणी राजकारण करत असेल ते चुकीचे आहे. या घटनेतील दोषींवर कारवाई होणार, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली.

मंत्री भारती पवार यांनी जिल्हा रुग्णालयात पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना. खासदार सुजय विखे, भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, शहराध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते.

मंत्री भारती पवार यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला. झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होईल, असेही आश्वासन दिले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा हे वादग्रस्त आहेत, या प्रश्नावर त्यांनी चौकशी करून कारवाई करू, अशी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान निधीतून दिलेल्या व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क होऊन ही आग लागल्याच्या आमदार रोहित पवार यांच्या आरोपावर भारती पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "अशा दुर्घटने वेळी आम्ही राजकारण करत नाही. जे राजकारण करत असतील ते दुर्दैवी आहेत.

Related Stories

No stories found.