नगर अग्नितांडव : खा.डॉ.सुजय विखे यांनी रुग्णांची केली तपासणी

नगर अग्नितांडव : खा.डॉ.सुजय विखे यांनी रुग्णांची केली तपासणी

मृतांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

डॉ. खा.सुजय विखे व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

ही घटना दुर्दैवी घटना असून मृत्युमुखी पडणाऱ्या नातेवाईकांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळवून देऊ तसेच कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या कामचुकार व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालानुसार पुढील दिशा ठरवू,ज्या रुग्णांना तातडीच्या उपचारांची गरज आहे, अशा रुग्णांना विखे पाटील फाउंडेशन व खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्वतः अग्नितांडवातील रुग्णांची विचारपूस करून तपासणी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com