नगर अग्नितांडव : देवेंद्र फडणवीसांनी केली 'ही' मागणी

नगर अग्नितांडव : देवेंद्र फडणवीसांनी केली 'ही' मागणी
देवेंद्र फडणवीस

अहमदनगर | Ahmednagar

नगर जिल्हा रूग्णालयातील अति दक्षता विभागाला शनिवारी सकाळी साडेदहा वाजता शॉक सक्रीटमुळे आग लागली. या विभागात १७ कोवीड रूग्ण दाखल होते. यापैकी दहा रूग्णांच्या होरपळून मृत्यू झाला तर १ रूग्ण अत्यवस्थ आहे. इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे‌.

आगीच्या या घटनेने जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आगीची घटना मनाला व्यथित करणारी असल्याचं म्हटलं आहे. तर, या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे की, 'नगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com