नगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव; 'या' दहा जणांचा मृत्यू

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची नावे....
नगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव; 'या' दहा जणांचा मृत्यू

अहमदनगर | Ahmednagar

ऐन दिवाळीत नगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या (Ahmednagar District Civil Hospital) आयसीयूममध्ये (ICU) भीषण आग लागली आहे.

नगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव; 'या' दहा जणांचा मृत्यू
अग्नीकांड : दोषींना सोडणार नाही, पालकमंत्री तातडीने नगरकडे रवाना

या आगीमध्ये होरपळून १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यामध्ये चार महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची नावे

रामकिसन विठ्ठल हरपुडे, वय 70, माका ता.नेवासा

सीताराम दगडू जाधव, वय 83, बख्तरपूर ता.शेवगाव

सत्यभामा शिवाजी घोडेचौरे, वय 65, तेलकुडगाव ता.नेवासा

कडुबाई गंगाधर खाटीक, वय 65, पाथरवाला, ता.नेवासा

शिवाजी सदाशिव पवार, वय 83, किन्ही ता. पारनेर

कोंडाबाई मधुकर कदम, वय 70, केडगाव, ता.नगर

आसराबाई गोविंद नागरे, वय 58, शेवगाव

छबाबी अहमद सय्यद, वय 65, शेंडी, ता.नगर

दीपक विश्वनाथ जगदाळे, वय 37, आश्वी ता.संगमनेर

एक अनोळखी पुरुष

तर उपचार सुरू असणार्‍यांमध्ये

लक्ष्मण विठ्ठल थोरात, वय 85, पाथर्डी

रंभाबाई पंजाराम विधाते, वय 70, बाभुळवेढा, ता.नेवासा

गोदाबाई पोपट ससाणे, वय 70, वांगदरी, ता.श्रीगोंदा

यमुना तात्याराम कांबळे, वय 65, केडगाव, ता.नगर

लक्ष्मण आसराजी सावळकर, वय 60, बोधेगाव, ता.शेवगाव

संतोष धर्माजी ठोकळ, वय 40, हनुमानवाडी, जि.बीड,

अंकुश किसन पवार, वय 40, पिंपरी अवघड, ता.राहुरी

यांचा समावेश आहे.

नगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव; 'या' दहा जणांचा मृत्यू
VIDEO : जिल्हा रुग्णालयाच्या करोना ICU विभागाला भीषण आग

दरम्यान आमदार संग्राम जगताप (sangram jagtap) यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) व पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांना घटनेची माहिती दिली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील (manoj patil) यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन जिल्हा रुग्णालय बहुतेक पोलिस बंदोबस्त वाढविला आहे.

नगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव; 'या' दहा जणांचा मृत्यू
नगर जिल्हा रुग्णालयाला आग; १० जणांचा होरपळून मृत्यू, ७ वर उपचार सुरु
नगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव; 'या' दहा जणांचा मृत्यू
नगर जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेस जबाबदार कोण?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com