जिल्हा रुग्णालय अग्नितांडव; मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

जिल्हा रुग्णालय अग्नितांडव; मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

अहमदनगर | Ahmednagar

अहमदनगर जिल्हा रूग्णालयाच्या (Ahmednagar District Civil Hospital) अतिदक्षता विभागाला (ICU) लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला असून ७ गंभीर आहेत. या घटनेमुळे नगर जिल्हा हादरला आहे. करोना काळात सर्व दक्षता पाळण्याच्य सूचना असताना ही आग कशी लागली, यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत देणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली आहे. तसेच ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे. एका आठवड्याच्या आत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्यात येण्याचे आदेश केले असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आगीच्या घटनेची पाहणी करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे रविवारी येणार असून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच आ.रोहित पवार दुपारी दाखल होत आहेत. अन्य नेते आधीच पोहचले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांकडून या घटनेची माहिती घेतली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com