जिल्हा रुग्णालय अग्नितांडव : मृत्यूची संख्या वाढली

जिल्हा रुग्णालय अग्नितांडव : मृत्यूची संख्या वाढली

अहमदनगर | Ahmedagar

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत (Ahmednagar District Civil Hospital fire)जखमी झालेल्या एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

लक्ष्मण आश्राजी सावळकर (वय- ६० रा. बोधेगाव ता. शेवगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या १२ झाली आहे.

६ नोव्हेंबर रोजी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून 11 लोकांचा मृत्यू झाला होता. तर सहा रूग्ण जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. यातील एकाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. आग लागली त्यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोना रूग्णांवर उपचार सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com