जिल्हा रुग्णालय अग्नितांडव; मृत्यूची संख्या वाढली

जिल्हा रुग्णालय अग्नितांडव; मृत्यूची संख्या वाढली

अहमदनगर|Ahmedagar

जिल्हा रूग्णालयातील आगीत शुक्रवारी सायंकाळी तेराव्या रुग्णाचा बळी गेला. गाेदाबाई पाेपट ससाणे (वय ७५ रा. वांगदरी ता. श्रीगाेंदे) यांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालयातील काेविड अतिदक्षता विभागाला ६ नाेव्हेंबरला सकाळी आग लागली हाेती. या घटनेच्या दिवशी ११ जणांचा बळी गेला हाेता. त्यानंतर दाेन दिवसापूर्वी आणखी एकाचा मृत्यू झाला हाेता. त्यावेळी घटनेतील मृतांची संख्या १२ झाली हाेती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी गाेदाबाई ससाणे यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकुण मृत्यूची संख्या १३ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणात नेमका काेणाला दाेष द्यायचा हा प्रश्नच आहे. आग प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुनील पाेखरणा यांच्यासह सहा जणांना कारवाई केली हाेती. त्यातील चाैघांना अटक झाली. अटक झालेल्या जामीन मंजूर झाला आहे. डाॅ. पाेखरणा यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन घेतला आहे.

आराेग्यमंत्री डाॅ. राजेश टाेपे यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर पुढील कारवाईसाठी पाठपुरावा देखील केलेला नाही. विधानपरिषदेचे विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन या घटनेत दाखल गुन्ह्यात आराेग्यमंत्री डाॅ. राजेश टाेपे आणि निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुनील पाेखरणाला आराेपी करावे, अशी मागणी केली हाेती. त्यासंदर्भात आपण स्वतः पत्र देऊ, असे सांगितले हाेते. परंतु त्यावरही काही झाले नाही. एकीकडे घटनेतील बळींची संख्या वाढत आहे. परंतु घटनेत कारवाईच्या घाेषणा हाेत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com