नगर अग्नितांडव : वैद्यकीय अधिकार्‍यासह चौघे अटकेत

शहर पोलिसांची कारवाई
नगर अग्नितांडव : वैद्यकीय अधिकार्‍यासह चौघे अटकेत

अहमदनगर | Ahmedagar

जिल्हा रूग्णालयातील करोना अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत अशी अटक आरोपींचे नावे आहेत.

यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे, तर शेख आणि आनंत यांचा सेवा समाप्ती करण्याचा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा आदेश आहे. जिल्हा रूग्णालयातील करोना अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर रोजी आग लागली होती. या आगीत 11 रूग्णांचा मृत्यू झाला असून सहा जणांवर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात सुरूवातील अज्ञात व्यक्तींविरोधात भादवि कलम 304 (अ) (हयगयीने मृत्यूस कारणीभूत ठरणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये 304 (सदोष मनुष्यवधाचा गुन्हा) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. सहायक निरीक्षक जे. सी. मुजावर यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातच मंगळवारी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौघांचा समावेश करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com