VIDEO : जिल्हा रुग्णालयाच्या करोना ICU विभागाला भीषण आग

VIDEO : जिल्हा रुग्णालयाच्या करोना ICU विभागाला भीषण आग

अहमदनगर | Ahmednagar

जिल्हा रूग्णालयातील (Ahmednagar District Civil Hospital) अतिदक्षता विभागाला (ICU) आज सकाळी दहा वाजता आग (FIre) लागली.

VIDEO : जिल्हा रुग्णालयाच्या करोना ICU विभागाला भीषण आग
नगर जिल्हा रुग्णालयाला आग; १० जणांचा होरपळून मृत्यू, ७ वर उपचार सुरु

यामध्ये उपचार सुरू असणाऱ्या दहा रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु त्याची अधिकृत माहिती जिल्हा रुग्णालय (District Civil Hospital)) प्रशासनाने सांगितली नाही.

अतिदक्षता विभागाला (ICU) आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. एमआयडीसी (MIDC) आणि महापालिकेच्या अग्निशामक दलांनी (Fire brigade) ही आग विझवली.

VIDEO : जिल्हा रुग्णालयाच्या करोना ICU विभागाला भीषण आग
नगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव; 'या' दहा जणांचा मृत्यू

या विभागात एकूण 17 रुग्ण होते. यात सुमारे 10 रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्याची अधिकृत माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितली नाही.

VIDEO : जिल्हा रुग्णालयाच्या करोना ICU विभागाला भीषण आग
नगर जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेस जबाबदार कोण?

आमदार संग्राम जगताप (sangram jagtap) यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) व पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांना घटनेची माहिती दिली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील (manoj patil) यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन जिल्हा रुग्णालय बहुतेक पोलिस बंदोबस्त वाढविला आहे.

VIDEO : जिल्हा रुग्णालयाच्या करोना ICU विभागाला भीषण आग
अग्नीकांड : दोषींना सोडणार नाही, पालकमंत्री तातडीने नगरकडे रवाना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com