जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 15209 मुलं-मुली लसवंत!

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 15209 मुलं-मुली लसवंत!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे सोमवारपासून (दि.3) करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. जिल्ह्यात 2 लाख 38 हजार मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असून पहिल्याच दिवशी 15 हजार 209 मुलांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. पहिल्या दिवशी लस घेणार्‍या मुलांमध्ये नगर जिल्हा राज्यात तिसर्‍या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर ठाणे असून त्या ठिकाणी 17 हजार 999 तर दुसर्‍या स्थानावर पुणे असून त्याठिकाणी 16 हजार 515 तर नगर जिल्हा हा तिसर्‍या स्थानावर आहे.

राष्ट्रीय स्तरावरून मिळालेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात करोना प्रतिबंधक लसीकरणास 16 जानेवारी 2021 पासून सुरुवात झाली होती. जिल्ह्यात आत्तापर्यंत उद्दिष्टापैकी 28 लाख 76 हजार 668 लोकांनी (75 टक्के) तर 17 लाख 27 हजार 225 (45 टक्के) लोकांनी लशीचे दोन्ही डोस पूर्ण केलेले आहेत. आता ओमायक्रोन व्हेरिएंटमुळे राष्ट्रीय स्तरावरून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर, 60 वर्षांवरील व सहव्याधी असणार्‍यांना तिसरा डोस (प्रिकॉशन डोस) देण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कालपासून लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील लाभार्थी सन 2007 किंवा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेला 2 लाख 38 हजार लसीकरणाचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी पहिल्या दिवशी 15 हजार 209 मुलांना करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com