
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा (District Central Cooperative Bank) नवा अध्यक्ष (New President) निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे. आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) नगर जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी सायंकाळी संचालक मंडाळाचे मते जाणून घेतली. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात (Congress MLA Balasaheb Thorat) व वरिष्ठ पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून उद्या सकाळी अध्यक्ष पदाचे नाव फायनल केले जाईल, असे विरोध पक्षनेते पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
उद्या (बुधवारी) बँकेचा अध्यक्ष निवडीसाठी सकाळी अकरा वाजता संचालक मंडळाची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी पवार यांनी आज सायंकाळी संचालक मंडळाची बैठक (Meeting) घेतली. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. थोरात यांच्यासह आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale), माजी आ. चंद्रशेखर घुले (Chandrashekhar Ghule), अनुराधा नागवडे (Anuradha Nagwade), माजी आ. राहुल जगताप (Rahul Jagtap), माजी आ. भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) आदी संचालक उपस्थित होते.
सर्व उपस्थित संचालक मंडळाशी विरोधी पक्षनेते पवार व आ. थोरात यांनी चर्चा केली. अध्यक्षपदाबाबत त्यांची मते जाणून घेतले. दोन ते तीन नावावर चर्चा झाली आहे. याबाबत आ. थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून उद्या सकाळी नाव फायनल केले जाणार आहे. दरम्यान आज रात्रीतून मोठे खलबते होणार असून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते याची उत्सुकता निर्माण झाली आहे.