कारखानदार, प्रस्थापितांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला

जिल्हा बँक : नुतन संचालक शिवाजी कर्डिले यांचा आरोप
कारखानदार, प्रस्थापितांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला

अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यात कारखानदार आणि प्रस्तापित नेत्यांनी माझ्या सारख्या जिरायत भागातील उमेदवाराला

पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, गतपाच वर्षात शेतकरी, दुध व्यवसायिक आणि बचत गटासाठी केलेल्या चांगल्या कामाच्या पावतीवरच मतदारांनी मला जिल्हा बँकेत निवडून दिले आहे. यामुळे येणार्‍या पाच वर्षात या सर्व घटकांसाठी जोमाने काम करणार असल्याची ग्वाही जिल्हा बँकेचे नूतन संचालक शिवाजी कर्डिले यांनी दिली. मात्र त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव घेणे टाळले.

नगर सेवा सोसायटीलचा निकाल लागल्यानंतर कर्डिले माध्यमांशी बोलत होते. यावेळी कर्जत सोसायटी मतदारसंघातील विजयी उमेदवार अंबादास पिसाळे देखील कर्डिले यांच्यासोबत होते. यावेळी कर्डिले म्हणाले, मी व संचालक पिसाळ हे दोघेही जिरायत भागातील संचालक आहोत. आमच्याकडे साखर कारखानदारी नाही. सामान्य शेतकर्‍यांच्या कुटूंबातून येवून आम्ही जिल्हा बँकेत प्रस्थापितांच्या विरोधात काम करतो.

जिल्हा बँक ही शेतकर्‍यांची बँक आहे. यामुळे शेतकरी, दुध व्यवसायिक आणि महिला बचत गटासाठी काम करण्याचा निर्णय गत पंचवार्षिकला घेतला. हा निर्णय प्रस्थापितांना भावला नाही. त्यांना वाटले दुष्काळी भागात मोडणार्‍या कर्डिले यांना निवडून दिले जावू नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना मतदारांनीच यश येवून दिले नाही. यामुळे विजय सुकर झाला असून मतदान करून विजयी करणार्‍या मतदारांचे आभार यावेळी कर्डिले यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com