संगमनेर l Sangamner

जिल्हा बँकेच्या 21 संचालकांच्या जागांपैकी 17 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित चार जागांसाठी आज (शनिवारी) मतदान सुरू आहे. नगर, कर्जत आणि पारनेर सोसायटी मतदारसंघासह बिगर शेती मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे.

दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या आज होत असलेल्या निवडणूकीत महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे मेहेर माध्यमिक विद्यालय मतदान केंद्रावर जावून बिगर शेती मतदारसंघातून आपले मतदान केले.

जिल्हा बँकेसाठी आज सकाळी 8 सुरू झाले. दुपारी 4 पर्यंत मतदानाची वेळ आहे. यासाठी 14 तालुक्याच्या ठिकाणी मतदान केंद्र असून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार खात्यातील 85 अधिकारी- कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

मतदानादरम्यान प्रत्येक मतदान केद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी प्रत्येक मतदान केंद्राबाहेर अतिरिक्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणुक केलेली आहे. मतदारांनी केलेल्या मतदानाची गोपनियता कायम राहाण्यासाठी मतदान केद्रांत मोबाईल अथवा कोणतेही ईलेट्रॉनिक उपकरण घेवूप जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याचे उल्लघंन करणार्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मतदान पुर्ण झाल्यांनतर मतपेट्या सील बंद करून सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. त्या ठिकााणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.