अहमदनगर l Ahmednagar

जिल्हा बँकेवर माजी आमदार राहुल जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अकोल्याचे माजी आमदार वैभव पिचड यांनी अनुसूचित जाती व बिगर शेती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
.रोहित पवारांना खड्यासारखं बाजूला का सारलं?.
दरम्यान, आमदार राहुल जगताप यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाजार समितीचे संचालक वैभव पाचपुते आणि प्रवीण कुरुमकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने जगताप यांचा जिल्हा बँकेचे संचालक होण्याचा मार्ग सुकर झाला.

राहुल जगताप यांना जिल्हा बँकेवर पाठविण्यावर आधीच एकमत झाले होते. राजेंद्र नागवडे यांनी कालच अर्ज माघारी घेवून तसे स्पष्ट संकेत दिले होते. त्याबाबतची औपचारिकता शिल्लक होती, ती आज पूर्ण झाली.

अकोल्यात मात्र माजी आ.वैभव पिचड यांना अनुसुचित जाती व बिगरशेती मतदारसंघातून माघार घ्यावी लागल्याने राजकीय चर्चांनी जोर पकडला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिचडांच्या नावाला विरोध होता. वैभव पिचड यांना बँकेवर घेण्यासाठी एका मातब्बर नेत्याने जोर लावला होता. पवारांची समजूतही काढली होती. पवार यांनी हा आग्रह मान्य केल्याचेही म्हटले जात होते. गेल्या 24 तासात मात्र पुन्हा काही संदर्भ बदलले आहेत. काल सीताराम गायकर यांच्या विरोधातील अर्ज मागे घेताना ‘अगस्ती’चा संदर्भ समोर आला. भाजपात जावून गोत्यात आलेले पिचड सध्या पवारांचा राग कमी करण्याचा प्रयत्नात आहेत.