जिल्हा बँक निवडणूक : संगमनेरची आघाडी, पारनेर पिछाडीवर

सोसायटी मतदारसंघात नगर, कर्जतची बाजी
जिल्हा सहकारी बँक
जिल्हा सहकारी बँक

अहमदनगर l प्रतिनिधी

21 पैंकी 17 जागा बिनविरोध झाल्यानंतर चार जागांसाठी आज शनिवारी मतदान सुरू आहे. प्रत्येक तालुक्यात मतदान केंद्रावर सुरू असलेल्या मतदानाची बारा वाजेपर्यंतची

आकडेवारी समोर आल्यानंतर संगमनेरमध्ये सर्वाधिक 195 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संगमनेरमध्ये 231 मतदार आहेत. सर्वात कमी मतदान पारनेरमध्ये झाले.

जिल्हा बँकेच्या मतदानात संगमनेर तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली तर पारनेर पिछाडीवर पडले आहे. नगर आणि कर्जत तालुक्यात जवळपास शंभर टक्के मतदान झाले आहे.

कर्जत, पारनेर आणि नगर सोसायटी मतदारसंघात पारनेर वगळता कर्जत, नगरमध्ये जवळपास शंभर टक्के मतदान झाले आहे. नगरमधील 109 पैंकी 103 तर कर्जतमध्ये 74 पैंकी 72 मतदारांनी मतदान केले. पारनेरमध्ये 105 पैंकी फक्त 12 मतदारांनी मतदान केले.

बिगरशेती मतदारसंघातील तालुकानिहाय मतदान असे (कंसात एकूण मतदार)

अकोले 54(54)

जामखेड 27 (48)

कर्जत 37 (64)

कोपरगाव 128 (166)

नगर 98 (222)

नेवासा 30 (85)

पारनेर 24 (79)

पाथर्डी 16 (29)

राहाता 100 (139)

राहुरी 40 (102)

संगमनेर 195 (231)

शेवगाव 16 (22)

श्रीगोंदा 39 (69)

श्रीरामपूर 40 (62)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com