कर्जत सोसायटी मतदारसंघातून पिसाळ जिल्हा बँकेवर

अवघ्या एक मताने पिसाळ याचा विजय
कर्जत सोसायटी मतदारसंघातून पिसाळ जिल्हा बँकेवर

अहमदनगर l प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या संचालकांच्या मंडळाच्या निवडणुकीसाठी कर्जत तालुका सेवा सोसायटी मतदारसंघातून

विद्यमान संचालक अंबादास पिसाळ विजयी झाले आहेत. पिसाळ यांनी विरोधी मिनाक्षी साळूंके यांचा अवघा एक मताने पराभव केला.

जिल्हा बँकेच्या 21 पैकी 17 जागा बिनविरोध निघाल्यानंतर चार जागांसाठी शनिवारी मतदान झाले. यात कर्जत सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात गटाकडून विद्यामान संचालिका मिनाक्षी साळुंके यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांच्या विरोधात विद्यमान संचालक अंबादास पिसाळ निवडणूक रिंगणात होते. मतमोजणीनंतर पिसाळ यांना यांना 3७ मते मिळाली असून सांळूके यांना ३६ मते मिळाली आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com