अहमदनगर l प्रतिनिधी

जिल्हा बँक निवडणुकीवर निर्णयासाठी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीतही

अंतिम निर्णय झाला नाही, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे 'चर्चा सुरू आहे' या पातळीवरच निर्णयाचे घोडे अडल्याचे म्हटले जात आहे. या बैठकीला जिल्ह्यातील तीन मंत्र्यापैकी ना. बाळासाहेब थोरात व ना.प्राजक्त तनपुरे हे दोघे उपस्थित होते. पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, बँकेसाठी विक्रमी अर्ज दाखल असून ११ फेब्रुवारीपर्यंत माघारीसाठी वेळ आहे. यामुळे बँकेच्या निवडणुकीचे फासे कसे पडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.